सिल्लोड, (प्रतिनिधी) : श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात जिल्हा परिषदेच्या दिशा सेलतर्फे ९ वी, १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय वायुसेनेतील करिअर संधींवर विशेष ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्रात विद्यार्थ्यांना वायुसेनेत करिअर करण्याचे मार्ग, प्रवेश प्रक्रिया आणि आवश्यक पात्रता याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना निर्माण व्हावी आणि त्यांना संरक्षण दलातील करिअरच्या विविध पर्यायांची माहिती मिळावी, हा या सत्राचा मुख्य उद्देश होता.
यात फ्लाइंग ब्रांच, टेक्निकल ब्रांच आणि ग्राऊंड ड्युटी अशा विविध विभागांतील संधींवर प्रकाश टाकण्यात आला. वायुसेनेत भरती होण्यासाठी आवश्यक शारीरिक आणि शैक्षणिक पात्रता, तसेच साहसी वृत्ती यावर चर्चा झाली. एनडीए आणि एएफसीएटी या परीक्षांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तरांचा तास झाला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. शाळेचे मुख्याध्यापक निशांत म्हस्के यांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण सत्रांचे आयोजन केले जाईल असे सांगितले.
हा उपक्रमाबद्दल यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षक रमेश सोनवणे, नरेशसिंग राजपूत, सुनील तांबे, रमेश परदेशी, कडूबा गीते, अंगद काळे, भास्कर सागरे, गणेश चव्हाण, अरविंद सोनवणे, अमोल ताटू, गजानन दौड, डॉ. रमेश काळे, पंकज सावंत, संगीता तायडे, संगीता काळे, नम्रता वडमारे, हर्षदा सनान्से, रमेश सपकाळ, शैलेश मोरे यांनी परिश्रम घेतले.















